• +91-2532461856 / 2462939
  • +91-7774084019

Terms & Conditions – Govind Dande & Sons Pvt. Ltd.

Centered Image
  1. SALE AND ORDER CANCELLATION POLICY:
  1. Once an order is placed, it cannot be cancelled under any circumstances or for any reason.
  2. The gold or amount deposited against the order will not be refunded.
  3. If the order needs to be cancelled, the labour charges and rate difference will be deducted from the advance paid.
  4. If the prepared order is not collected within 45 days, interest at the rate of 18% p.a. will be charged as compensation, and if gold prices increase, the customer must pay the difference as per current market rates. The ordered items will not be handed over without the original receipt.
  5. The firm will not be responsible if the order cannot be completed on the given date due to unavoidable circumstances.
  6. In silver ornaments, utensils, and other articles, a difference of up to 5% in purity may occur due to the production process. In such cases, the purchase/exchange will be done based on the purity mentioned on the bill.
  7. Lobster locks, cast locks, and hinges used in jewellery may contain stainless steel pins (springs) weighing from 0.010 gm to 0.060 gm. These are essential for functionality and are included in the total weight of the jewellery.
  1. RETURN POLICY:
  1. Goods once sold can be returned within 7 days for full credit, provided there is no damage, usage, or alteration. Original packaging, certificates, and documents must be submitted in their original condition.
  2. If any of the above conditions are not met, the firm reserves the right to reject the return.
  3. Instead of a refund, a credit note will be issued which can be used for future purchases at our showroom. No cash refunds will be given under any circumstances.
  4. If the ornament has been altered from its original form, the firm will not guarantee its purity.
  5. A variation of up to 0.050 gm in weight may occur; the firm will not be responsible for this difference.
  1. EXCHANGE / BUYBACK POLICY (Gold, Silver, Diamonds, Platinum):
  1. A copy of the original bill is mandatory for exchange/buyback. Only the person who purchased the ornament can make the exchange/buyback. No transaction will be entertained with any third party.
  2. In suspicious cases, the firm reserves the right to melt the ornaments brought for exchange/buyback. The customer shall have no objection to this.
  3. For exchange/buyback transactions, the firm has the right to request Aadhaar and PAN cards. Customers are expected to cooperate in such cases.
  4. In exchange/buyback transactions, there will be no deduction in actual weight (except for platinum ornaments).
  5. The following rates shall apply for exchange and buyback transactions:
Section Exchange Value Buyback Value
1) Gold Ornaments (All Purities) Price will be determined as per current market rate. 3% less than the current market rate.
2) Gold Bullion (All Purities) Price will be determined as per current market rate. 1.5% less than the current market rate.
3) Diamond Jewellery (All Purities) Price of gold and diamonds will be as per current market rate. Diamonds: 10% less than current rate; Gold: 3% less than current rate.
4) Silver Jewellery, Utensils & Articles (All Purities) Price as per current market rate. 3% less than the current market rate.
5) Silver Bullion (All Purities) Price as per current market rate. 1.5% less than the current market rate.
6) Platinum Jewellery 5% deduction in weight; platinum and diamonds as per current market rate. 10% deduction in weight; diamonds at 10% less than current market rate.
  1. In case of exchange/buyback, charges for stones, pearls, beads, enamel, making charges, and all types of taxes will not be refunded.
  2. During periods of price fluctuation, Govind Dande & Sons Pvt. Ltd. reserves the right to amend the above terms and conditions without prior notice.
  3. The firm reserves full rights to accept or reject ornaments brought for exchange/buyback.
  1. GEMSTONES:
  1. Pearls, corals, lasaniyas, and semi-precious stones, and similar gems will not be accepted for buyback.
  2. Other gemstones (if in good condition and accompanied by the original purchase bill) will be purchased at 50% of the original sale price, excluding taxes.
  3. Bangkok topaz will be purchased at 30% of the original sale price, excluding taxes.
  4. Gems such as emeralds, hessonite, and lasaniyas are delicate and must be handled carefully.
  1. PAYMENT & BILLS:
  1. For buyback amounts above ₹19,500/-, the amount will be credited directly to the customer’s bank account mentioned on the bill or paid by cheque in the customer’s name.
  2. Original bill copy is mandatory for all transactions including order delivery, exchange/buyback, and repairs.
  3. Payments will be accepted only from the account in the name mentioned on the bill.
  4. As per income tax rules, for transactions above ₹1,99,999/-, a copy of the customer’s PAN card is required. For cash transactions above ₹49,999/-, both PAN and Aadhaar copies are mandatory.
  1. LIABILITY & LEGAL TERMS:
  1. The jewellery has been shown to you in good condition. As ornaments are delicate, they must be handled with care. The firm will not be responsible for any damage or breakage.
  2. When a customer brings ornaments for buyback/exchange, the ownership of such items is permanently transferred to the firm. If any dispute regarding ownership arises before the transaction, the customer will be solely responsible and will not hold the firm liable. The agreed price has been paid satisfactorily by cash, cheque, or bank transfer as per current rates.
  3. The firm reserves the right to modify these terms and conditions at any time.
  4. Jurisdiction: Nashik Court only.

📍 Nashik Road: 777 408 4019 | Sinnar: 898 327 5498 | Sangamner: 915 600 9908

अटी व शर्ती

Centered Image
  1. विक्री आणि ऑर्डरस् रद्द करण्याबाबत:
    1. एकदा दिलेली ऑर्डर कोणत्याही कारणास्तव व कोणत्याही परिस्थितीत रद्द केली जाणार नाही.
    2. दिलेल्या ऑर्डरसाठी जमा केलेले सोने किंवा रक्कम परत दिली जाणार नाही.
    3. एकदा दिलेली ऑर्डर रद्द करावयाची असेल तर दिलेल्या अॅडव्हान्समधून मजूरी व भाव फरक वजा केला जाईल.
    4. तयार झालेली ऑर्डर ४५ दिवसांच्या आत घेऊन न गेल्यास नुकसान भरपाई म्हणून १८% (द.सा.द.शे.) दराने व्याज द्यावे लागेल, तसेच भाव वाढल्यास वाढीव बाजारभावाचा फरक द्यावा लागेल. ऑर्डर दिलेला माल पावती शिवाय मिळणार नाहीं.
    5. काही अपरीहार्य कारणास्तव दिलेल्या तारखेस ऑर्डर पूर्ण होऊ न शकल्यास पेढी जबाबदार राहणार नाही.
    6. चांदीच्या दागिन्यांमध्ये, भांड्यांमध्ये तसेच इतर उपकरणांमध्ये उत्पादन प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त शुद्धतेमध्ये ५% फरक येऊ शकतो.
    7. दागिन्यांमध्ये वापरलेले लॉबस्टर लॉक, कास्ट लॉक आणि बिजागऱ्यांमध्ये स्टेनलेस स्टील पिन वापरलेले असू शकतात आणि ते दागिन्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहेत.
  2. रिटर्न पॉलिसी:
    1. एकदा विकलेला माल ७ दिवसांच्या आत पूर्ण क्रेडिटसह परत देता येईल, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान, वापर अथवा बदल केलेला नसावा.
    2. वरील अटी पूर्ण न झाल्यास पेढीस परतावा नाकारण्याचा पूर्ण अधिकार राहील.
    3. परताव्याच्या बदल्यात ग्राहकास क्रेडिट नोट दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत रोख रक्कम परत केली जाणार नाही.
    4. दागिना मूळ स्वरूपातून बदलल्यास पेढी शुद्धतेची हमी देणार नाही.
    5. कोणत्याही उत्पादनामध्ये ०.०५० ग्रॅम वजनाचा फरक होऊ शकतो. या फरकासाठी पेढी जबाबदार राहणार नाही.
  3. बदला/मोड व्यवहार सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम
    1. दागिन्यांच्या बदला/मोड करण्याकरिता मूळ बिलाची प्रत अनिवार्य आहे. ज्यांनी दागिना खरेदी केला आहे तीच व्यक्ती बदला/मोड करू शकतील. इतर व्यक्तीसोबत कुठलाही व्यवहार पेढीकडून केला जाणार नाही.
    2. संशयास्पद प्रकरणांमध्ये पेढीस बदला /मोड साठी आणलेले दागिने वितळवण्याचा अधिकार पेढीस राहील. यासाठी ग्राहकास कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही.
    3. बदला/मोड व्यवहारासाठी पेढीला ग्राहकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड मागण्याचा अधिकार राहील. अशा प्रसंगी ग्राहकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
    4. दागिन्यांच्या बदला /मोड व्यवहारामध्ये प्रत्यक्ष वजनामध्ये कोणतीही घट धरली जाणार नाही (प्लॅटिनम दागिने वगळता)
    5. बदला / मोड व्यवहारासाठी खालीलप्रमाणे मूल्य निश्चित केले जाईल:
      विभाग बदल व्यवहार मोड व्यवहार
      १) सामान्य दागिने (सर्व शुद्धतेचे) साधारण किंमती चालू बाजारभावानुसार ठरविली जाईल. चालू बाजार भावापेक्षा ३% कमी दराने रक्कम मिळेल.
      २) सोन्याचे दागिने (सर्व शुद्धतेचे) सोन्याच्या दागिन्यांची चालू बाजारभावानुसार किंमत ठरविली जाईल. चालू बाजार भावापेक्षा १.५% कमी दराने रक्कम मिळेल.
      ३) हिर्‍याचे दागिने (सर्व शुद्धतेचे) सोन्य व हिर्‍याची चालू बाजारभावानुसार किंमत ठरविली जाईल. हिर्‍याचे चालू बाजार भावापेक्षा १०% कमी दराने व साधारण दागिने चालू बाजार भावापेक्षा ३% कमी दराने रक्कम मिळेल.
      ४) चांदीचे दागिने, भांडी व उपकरणे (सर्व शुद्धतेचे) चांदीच्या चालू बाजारभावानुसार किंमत ठरविली जाईल. चालू बाजार भावापेक्षा ३% कमी दराने रक्कम मिळेल.
      ५) चांदी बुजविलेले (सर्व शुद्धतेचे) चांदी बुजविलेल्या चालू बाजारभावानुसार किंमत ठरविली जाईल. चालू बाजार भावापेक्षा १.५% कमी दराने रक्कम मिळेल.
      ६) प्लेटिनमचे दागिने वजनामध्ये ५% घट, प्लेटिनमच्या चालू बाजारभावानुसार, हिर्‍याच्या चालू बाजारभावानुसार किंमत ठरविली जाईल. वजनामध्ये ५% घट, हिर्‍याचे चालू बाजारभावापेक्षा १०% कमी दराने रक्कम मिळेल.
    6. वस्तू विक्री (मोडी) साठी अथवा बदली करण्यासाठी आणल्यास खडे, मोती, मणी, मिना, मजुरी व सर्व प्रकारच्या करांचे पैसे परत मिळणार नाहीत.
    7. दरातील अनिश्चिततेच्या काळात कोणतीही पूर्वसुचना न देता वरील सर्व नियमांमध्ये फेरबदल करण्याचे सर्व अधिकार गोविंद दंडे अॅण्ड सन्स् प्रा. लि. कडे राखीव आहेत.
    8. दागिने मोडीसाठी/बदली करण्यासाठी आणल्यास ते स्वीकारण्याचे अथवा न स्वीकारण्याचे सर्व अधिकार गोविंद दंडे अॅण्ड सन्स् प्रा. लि. कडे राखीव आहेत.
  4. रत्ने:
    1. मोती, पोवळा, लसण्या व सेमी प्रिशिअस स्टोन आणि यासारखी इतर रत्ने पेढीकडून परत घेतली जाणार नाही.
    2. इतर रत्ने (जर चांगल्या स्थितीत असतील आणि मूळ खरेदी बिल असेल तर) कर वगळता मूळ विक्री किमतीच्या ५०% दराने खरेदी केली जातील.
    3. बँकॉक पुष्कराज मूळ विक्री किमतीच्या ३०% दराने खरेदी केला जाईल.
    4. पाचू, गोमेद आणि लसण्या यांसारखी रत्ने नाजूक असतात, त्यामुळे काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे.
  5. पेमेंट व बिलस्:
    1. मोड रक्कम ₹१९,५०० पेक्षा जास्त असल्यास ती रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल किंवा चेकद्वारे दिली जाईल.
    2. सर्व व्यवहारांसाठी मूळ बिलाची प्रत असणे अनिवार्य आहे.
    3. फक्त बिलावर नमूद असलेल्या नावाच्या खात्यामधूनच पेमेंट स्वीकारली जाईल.
    4. आयकर नियमांनुसार ₹१,९९,९९९ पेक्षा जास्त व्यवहारासाठी पॅनकार्ड आवश्यक आहे, आणि ₹४९,९९९ पेक्षा जास्त रोख व्यवहारासाठी पॅन आणि आधार दोन्ही आवश्यक आहेत.
  6. जबाबदारी व कायदेशीर अटी:
    1. दागिने चांगल्या स्थितीत असल्याचे दाखवले आहे, आणि त्यांचा वापर काळजीपूर्वक करावा.
    2. मोड/बदलीसाठी आणलेला माल पेढीकडे मालकी हस्तांतरित झालेला आहे. कोणताही वाद उद्भवल्यास ग्राहक जबाबदार राहील.
    3. पेढीकडे वरील अटी व शर्ती कधीही बदलण्याचा अधिकार आहे.
    4. सर्व कायदेशीर कार्यवाही नाशिक न्यायकक्षेत होईल.

नाशिकरोड 777 408 4019 | सिन्नर 898 327 5498 | संगमनेर 915 600 9908